🧿🧿लोकांच्या विस्थापनाबाबतचा UNICEF संस्थेचा
“लॉस्ट अॅट होम” अहवाल🧿🧿
🔶संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थेनी स्थानिक आणि जागतिक पातळीवर झालेल्या लोकांच्या विस्थापनाबाबतचा “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला आहे.
🔷 अहवालातल्या ठळक बाबी 🔷
🔶 2019 साली जगभरात 33 दशलक्ष लोकांचे विस्थापन झाल्याची नोंद झाली असून त्यापैकी 25 दशलक्ष नैसर्गिक संकटांमुळे तर 8.5 दशलक्ष संघर्ष आणि हिंसाचारामुळे झालेले आहे. यात 12 दशलक्ष बालकांचा समावेश होता.
🔶 याच काळात भारतात 5,037,000 लोकांचे विस्थापन झाले असून त्यापैकी 5,018,000 लोकांचे नैसर्गिक संकटांमुळे तर 19,000 लोकांचे संघर्ष आणि हिंसाचारामुळे झाले.
🔶2019 साली पूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक स्थलांतर झाले असून त्याचे प्रमाण एकूण जागतिक प्रमाणाच्या 39 टक्के होते आणि हा आकडा सुमारे 10 दशलक्ष एवढा विक्रमी होता. दक्षिण आशियामध्ये 9.5 दशलक्ष लोकांनी स्थलांतरण केले.
🔶 केवळ भारत, बांगलादेश, चीन आणि फिलिपिन्स या देशांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या स्थलांतरणाचे प्रमाण जगाच्या तुलनेत 69 टक्के होते.
🔶 2019 सालाच्या अंती, संघर्ष आणि हिंसाचारामुळे स्थानिक पातळीवर झालेल्या स्थलांतरणाचे प्रमाण अंदाजे 46 दशलक्ष एवढे होते.
Comments
Post a Comment