🔷सानिया मिर्झा ठरली Fed Cup Heart पुरस्काराची मानकरी, बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान 🔷
🔶भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा Fed Cup Heart पुरस्कार पटकावला आहे.
🔶हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
🔶Asia/Oceania गटात सानिया मिर्झाने १० हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
🔶चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी ६० टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.
🔶Fed Cup Heart पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे. देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा माझा मानस असल्याचं सानिया मिर्झाने म्हटलंय.
Comments
Post a Comment