गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना

​​🧿🧿गरिबांसाठी पंतप्रधान 
गरीब कल्याण अन्न योजना🧿🧿
🔶करोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून त्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे.

🔷या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे 🔷

🔥करोनाच्या महासाथीमुळे अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो किंवा अन्नधान्य उपलब्ध होऊ शकत नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने गरीब कुटुंबांसाठी तीन महिन्यांचे धान्य पुरवण्याचे ठरवले आहे.

🔥८० कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

🔥त्यांना सध्या मिळत असलेल्या धान्याच्या दुप्पट धान्य पुढील तीन महिने देण्यात येणार असून ते मोफत असणार आहे.

🔥या योजनेंतर्गत करोनामुळे बाधित झालेल्या देशभरातील गरीब कुटुंबांना १२० लाख मेट्रिक टन धान्य वितरित केले जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार येणाऱ्या कुटुंबांना एप्रिल, मे आणि जून २०२० मध्ये त्यांना मिळणाऱ्या धान्याच्या दुप्प्ट धान्य मिळणार असून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभधारकांनाही त्यांना मिळणाऱ्या नियमित धान्याबरोबरच ५ किलो जास्तीचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. या योजनांना राज्य सरकारकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून ६ मेपर्यंत ६९.२८ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.

Comments