आता आयसीसीमध्ये ‘दादा’गिरी? अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य उमेदवार – ग्रॅमी स्मिथ

🧿🧿आता आयसीसीमध्ये ‘दादा’गिरी? अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य उमेदवार – ग्रॅमी स्मिथ 🧿🧿
🔶प्रशासकीय कारभारातील अनियमीतता आणि लोढा समितीच्या शिफारसींचं पालन करण्यासाठी केलेली दिरंगाई यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर कारवाई करत, सर्वात श्रीमंत बोर्डावर क्रिकेट प्रशासकीय समितीची स्थापना केली.

🔶यानंतर काही वर्षांनी नवीन संविधानानुसार बीसीसीआयच्या निवडणूका पार पडल्या, ज्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गांगुलीने बीसीसीआयच्या कारभारात काही लक्षणीय बदल केले.

🔶सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, सर्व क्रिकेट बोर्डांना आपलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या दौऱ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ यांनी सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

Comments