🔷भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना
योद्ध्यांना अनोखा सलाम.🔷
🔥भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना समाल केला आहे.
🔥तर आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाले्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे.
🔥तसेच हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव ‘डॉक्टर आंबा’ तर दुसऱ्याचे ‘पोलीस आंबा’ असं ठेवलं आहे.
🔥बायगत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये 1600 वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात.
🔥उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या 20 एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी 8 एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात.
🔥तर त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर 300 प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं.
🔥तसेच आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना 2008 साली भारत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला .
Comments
Post a Comment