🧿🧿रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; ८० कोटी लोकांना होणार फायदा 🧿🧿
🔶जर तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी एक दिलासादायक वृत्त आहे. केंद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
🔶सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. रेशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.
🔶सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. रेशन कार्डाशी आधार क्रमांक न जोडल्यास ते रद्द करण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापही कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
Comments
Post a Comment