दी अँकरेज डेली, प्रो पब्लिका यांना पत्रकारितेतील पुलित्झर पुरस्कार

​​🧿🧿दी अँकरेज डेली, प्रो पब्लिका यांना पत्रकारितेतील पुलित्झर पुरस्कार 🧿🧿
🔶अलास्कातील एक  तृतीयांश खेडय़ात सार्वजनिक सुरक्षा नसून तेथे पोलीस संरक्षण नावाचा प्रकारच अस्तित्वात नसल्याची वृत्तमालिका प्रकाशित करणाऱ्या दी अँकरेज डेली न्यूज, प्रो पब्लिका या वृत्तपत्रांना  पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. करोना विषाणूच्या साथीमुळे या पुरस्कारांच्या घोषणेस विलंब झाला आहे.

🔶‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला शोध पत्रकारितेसाठी या पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्यांनी न्यूयॉर्क शहरातील टॅक्सी उद्योगातील कर्ज व्यवस्थेचा पर्दाफाश केला होता. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारबाबत जोखीम पत्करून केलेल्या आंतरराष्ट्रीय वार्ताकनासाठीही ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला गौरवण्यात आले आहे.

🔶‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ला स्पष्टीकरणात्मक वार्ताकनासाठी हा पुरस्कार मिळाला असून उच्च तापमानामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीचा विचार त्यांनी मांडला होता.

🔶‘असोसिएटेड प्रेस’ला छायाचित्रांकनासाठी वृत्तछायाचित्र पुरस्कार मिळाला असून त्यात भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या परिस्थितीतील  छायाचित्रांचा समावेश आहे. 

🔶रॉयटर्सला हाँगकाँगमधील आंदोलनाच्या छायाचित्रांसाठी ब्रेकिंग न्यूज छायाचित्र पुरस्कार मिळाला आहे. आधी पुलित्झर पुरस्कार कार्यक्रम २० एप्रिलला होणार होता, पण करोनामुळे तो लांबणीवर टाकण्यात आला.

Comments