🧿🧿देशांतर्गत विमान सेवा आजपासून 🧿🧿
🔶नवी दिल्ली : टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज ५० विमानांची ये-जा होणार आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
🔶केंद्र सरकारने २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची भूमिका केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या कानावर घातली होती. राज्यातील जनतेशी रविवारी दुपारी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून प्रवासी विमान सेवा नकोच, अशी भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच राज्य सरकारने भूमिका बदलली.
🔶मुंबईतून दररोज २५ विमानांचे उड्डाण तर २५ विमाने अन्य शहरांतून येतील, असे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी जाहीर के ले. तसेच राज्य सरकारच्या वतीने लवकरच नियमावली जाहीर के ली जाईल, असे ट्वीट मलिक यांनी के ले. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता, देशांतर्गत विमान सेवा मुंबईतून सुरू व्हावी, अशी आग्रही भूमिका केंद्राने मांडली. केंद्राच्या विनंतीनंतरच महाराष्ट्र सरकारने निर्णय बदलल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.
Comments
Post a Comment