🧿🧿लॉकडाउनदरम्यान तीन राज्यांनी केला श्रम कायद्यात बदल.🧿🧿
🔶करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यातच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे अर्थचक्रही पूर्णपणे थांबलं आहे.
🔶अशा परिस्थितीत काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरूवात केली आहे.परंतु यानंतर काही राज्यांनी आपल्या कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
🔶लोकांच्या नोकऱ्याही कायम राहाव्या आणि गुंतवणुकदारही आकर्षित व्हावे, यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारनं आपल्या श्रम कायद्यात बदल केला आहे.
🔶तसेच यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता या राज्यांच्या सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.श्रम कायद्यांमध्ये बदल करण्याच्या या निर्णयाला ट्रेड युनियननं विरोध केला आहे.
🔶कायद्यात बदल केल्यामुळे कामगारांचं शोषण होऊ शकते अशी भीती ट्रेड युनियनकडून व्यक्त करण्यात आली आहे.कामगार कायद्यात सर्वात महत्त्वाचा करण्यात आलेला बदल म्हणजे कामाचे तास 8 तासांवरून वाढवून 12 तास करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment