आंतरराष्ट्रीय पर्यटन ६०-८० टक्क्यांनी घटणार

​​🧿🧿आंतरराष्ट्रीय पर्यटन 
६०-८० टक्क्यांनी घटणार 🧿🧿
🔶आंतरराष्ट्रीय पर्यटन हे करोनाच्या साथीमुळे ६० ते ८० टक्क्यांनी घटणार असून त्यामुळे ९१० अब्ज ते १.२ लाख कोटी डॉलर्सचा फटका महसुलात बसणार असल्याची माहिती जागतिक पर्यटन संघटनेने दिली आहे. याचा परिणाम म्हणून जगात १० ते १२ कोटी लोक रोजगार गमावणार आहेत.

🔶करोनाचा प्रसार जगात बहुतांश देशात झाला असून आतापर्यंत ४१ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर २,८२,७१९ लोक बळी पडले आहेत. अमेरिकेत १३ लाख लोकांना संसर्ग झाला असून ८० हजार बळी गेले आहेत.

🔶जागतिक पर्यटन संघटनेने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत २०२० मधील पहिल्या तिमाहीत २२ टक्केघट झाली आहे. जागतिक करोना साथीमुळे आता वर्षांला पर्यटनात २०१९ च्या तुलनेत  ६० ते ८० टक्के घट होणार आहे.

🔶जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव झुराब पोलिकासविली यांनी सांगितले की, मार्चमध्ये अनेक देशात टाळेबंदीमुळे पर्यटकांची संख्या ५७ टक्केकमी झाली आहे. विमानतळे व राष्ट्रीय सीमा बंद असल्याने ६७ दशलक्षआंतरराष्ट्रीय प्रवासी कमी झाले असून ८० अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आशिया व पॅसिफिकमधील आकडेवारीनुसार  पर्यटक संख्या ३३ दशलक्षांनी घटली असून युरोपात २२ दशलक्षांनी कमी झाली आहे.

Comments