भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन समुद्र सेतू’

​​🧿🧿भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन समुद्र सेतू’🧿🧿
🔶कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतात परत येऊ पाहणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ या नावाची एक मोहीम चालवली आहे.

🔶8 मे 2020 रोजी सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नौदल मालदीव देशात असलेल्या भारतीयांना परत आणणार. मालदीवमधून एकूण 1000 व्यक्ती हलविण्याची ही योजना आहे.

🔷 ठळक बाबी 🔷

🔶 या मोहिमेसाठी नौदलाचे INS जलश्व आणि INS मगर ही दोन जहाजे मालदीवकडे पाठविण्यात आली आहेत.

🔶 लोकांना परत आणून केरळच्या कोची या शहरात उतरविण्यात येणार. तिथे त्यांना विलगीकरणासाठी राज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार.

🔶 ही संपूर्ण मोहीम संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि इतर केंद्र व राज्य सरकारच्या इतर संस्थांच्या समन्वयाने चालवली जात आहे.

Comments