दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे निधन

🔷दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका 
मालविका मराठे यांचे निधन 🔷
🔥दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 

🔥त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. गुरुवारी दुपारी अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

🔥मालविका यांनी सुरुवातीला आकाशवाणीत हंगामी उद्घोषक म्हणून काम केले. 

🔥त्यानंतर त्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘हॅलो सखी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जवळपास १२ वर्षे सूत्रसंचालन करत होत्या. या कार्यक्रमामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

Comments