🧿🧿राज्याच्या सीमेवर अडकलेले ३००० मजूर ‘लालपरी’च्या मदतीमुळे पोहोचले घरी.🧿🧿
🔶लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये आणि राज्यातील इतर भागांमध्ये अडकलेल्या नागरिकव मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पायी जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, राज्य सरकारनं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम सुरू केलं असून, लालपरी अर्थात एसटीमुळे ३००० जण सुखरुप घरी पोहोचले आहेत.
🔶लॉकडाउन लागू झाल्यानंतर परराज्यातील कामगारांनी घराचे रस्ते धरले. त्याचप्रमाणे इतर राज्यात असलेल्या महाराष्ट्रातील कामगारांनीही राज्याची वाट धरली. प्रवासी वाहतुकीची कोणतीही सोय नसल्यानं अनेक जण पायी निघाल्याचं दिसत आहेत. तर काहीजण मिळेल त्या वाहनानं घर जवळ करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबाद-जालना दरम्यान झालेल्या मजुरांच्या अपघातानंतर राज्य सरकारनं परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी आणण्यासाठी पाऊलं उचलली आहेत.
🔶राज्याच्या सीमेवर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील ३००० मजूरांनी एसटीमुळे सुखरुपणे घरी पोहोचता आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याविषयी माहिती दिली. “आज (१० मे) राज्याच्या सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३००० मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुखरुप पोहोचवण्यात आलं आहे. या सर्व प्रवासात सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात आले होते.
Comments
Post a Comment