टाळेबंदीबाबत पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद

🧿🧿टाळेबंदीबाबत पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद 🧿🧿
🔶नवी दिल्ली : टाळेबंदीचा तिसरा टप्पा या आठवडय़ाअखेर संपत असताना करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दुपारी तीन वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. टाळेबंदीमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

🔶टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात बैठक चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. टाळेबंदी लागू केल्यापासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक आहे.

🔶या बठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. या बठकीत स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासंदर्भातही माहिती देण्यात आली. गौबा यांच्या चच्रेत उपस्थित झालेल्या मुद्दय़ांच्या आधारेही मुख्यमंत्र्यांच्या बठकीत सविस्तर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Comments