🔷आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार.🔷
🔥आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
🔥आयसीआयसीआय बँकेने मुंबई शेअर बाजाराला व राष्ट्रीय शेअर बाजाराला हे कळवलं आहे. बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने, कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापनानं म्हटलं आहे.
🔥आयसीआयसीआय बँकेने या संदर्भातला जो प्रस्ताव RBI कडे पाठवला होता त्या प्रस्तावाला आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC दिलं आहे.
🔥तर बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी ज्या औपचारिकता आणि निर्देशांचं पालन करावं लागतं ते केलं जावं असं RBI ने स्पष्ट केलं आहे.
Comments
Post a Comment