स्वातंत्र्यानंतर तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चार खेळाडूंपैकी बलबीर हे एक होते.

🔷 हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन;क्रीडाजगतात हळहळ 🔷

🔥भारतीय हॉकी विश्वातील दिग्गज खेळाडू बलबीर सिंग यांचे आज (ता.२५) सोमवारी निधन झाले. 

🔥ते ९६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटका आल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये भरती होते.

🔥 स्वातंत्र्यानंतर तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चार खेळाडूंपैकी बलबीर हे एक होते.
🔷ऑलिम्पिक स्पर्धेत 
❗️१९४८, 
❗️१९५२ आणि 
❗️१९५६ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. 

🔥भारताच्या सुवर्णयुगाचे ते साक्षीदार होते.१९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. 

🔥ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे. 

🔥१९५७मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले गेले आणि हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले खेळाडू होते.

Comments