​भारत सरकार आणि AIIB यांच्या दरम्यान कोविड-19 मदतीसाठी 500 दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या

🧿🧿​भारत सरकार आणि AIIB यांच्या दरम्यान कोविड-19 मदतीसाठी 500 दशलक्ष डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या🧿🧿
🔶कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) या संस्थेच्या दरम्यान 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेच्या “कोविड19 आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्जता प्रकल्प”वर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

🔶ही मदत देशातल्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणार असून त्यातून बाधित लोक, धोका असलेले लोक, वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी आणि सेवा पुरवठादार, वैद्यकीय आणि चाचणी सुविधा,राष्ट्रीय आणि प्राणी आरोग्य संस्था यांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.

🔷इतर ठळक बाबी🔷

🔥बॅंकेकडून भारताला आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आलेली ही पहिलीच मदत आहे.

🔥या प्रकल्पामुळे भारतात कोविड19 रोगाचा प्रसाराचा वेग कमी करणे केंद्र सरकारला शक्य होणार. PPE खरेदी, ऑक्सिजन आणि औषधे वितरण प्रणालीची व्याप्ती वाढवणे, कोविड-19 आणि भविष्यातल्या अन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंध आणि रुग्ण व्यवस्थापन यासाठी लवचिक आरोग्य यंत्रणा उभारणे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने काम करणाऱ्या भारतीय आणि इतर जागतिक संस्थांद्वारे कोविड-19 वरील संशोधनाला सहाय्य करणे आणि प्रकल्पाच्या समन्वय तसेच व्यवस्थापनासाठी सार्वजनिक व्यवस्था  बळकट करणे यांसारख्या उपाययोजनांना गती मिळणार.

🔥 या प्रकल्पाला जागतिक बँक आणि AIIB कडून एकूण 1.5 अब्ज डॉलर एवढ्या निधीचे अर्थसहाय्य असून त्यातले 1 अब्ज डॉलर जागतिक बँक तर 500 दशलक्ष डॉलर AIIB पुरविणार आहे.

🔥आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय अभियान (NHM), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

Comments