12 मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार.

🧿🧿12 मे पासून मर्यादित मार्गांवर
 रेल्वे धावणार.🧿🧿
🔶करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. 

🔶लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

🔶तर त्यानंतर रेल्वे प्रशासनानं 17 मे पर्यंत रेल्वे सेवा सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

🔶पंरंतु आता 12 मे पासून मर्यादित रेल्वे मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔶 तसंच संध्याकाळपासून या रेल्वे सेवांचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

🔶12 मे पासून काही ठराविक मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली.

🔶तसेच या मध्ये दिल्ली ते मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावी, तिरुअनंतरपुरम, मडगाव, दिब्रुगढ, अगरताला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई या स्थानकांना जोडणारी रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments